डॉ दाभोळकर यांच्या यांच्या खुन्याला शिक्षा कधी होणार ? – मुक्त दाभोळकर
डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज सात वर्ष पूर्ण झाली आहे. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच तापले होते. त्यानंतर डॉ. दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला सुपूर्त करण्यात आला होता. मात्र अद्याप या प्रकरणाचा छडा लावण्यात सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात सीबीआयला अपयश आले आहे.
या प्रकरणी डॉ दाभोळकर यांच्या कन्या डॉ मुक्ता दाभोळकर यांनी खंत व्यक्त केली आहे. “जोपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पकडले जात नाही, तोपर्यंत या देशातील विवेकवादी माणसं सुरक्षित आहेत असे मानता येणार नाही.” असंही मुक्ता दाभोळकर यांनी म्हटले आहे.
डॉ. दाभोळकरांच्या प्रयत्नांमुळे राज्यात जादूटोणा विरोधी कायदा होऊन बुवाबाजीला छाप बसला. आता देशभरातील इतर राज्यांमध्येही हा कायदा लागू करण्याची मागणी होत आहे. “डॉ. दाभोळकरांची हत्या करुन विचार संपवता येईल असे मारेकऱ्यांना वाटले होते, पण अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी न डगमगता ही चळवळ सुरू ठेवली आहे,” असेही त्या म्हणाल्या