काय सांगता | थेट आमदारांच्या गाडीवरील ११ हजाराचा दंड जागेवर वसूल

 

बीड | माजलगाव पोलिसांनी चक्क आमदाराची गाडी अडवली आहे. मात्र सुदैवाने गाडीत आमदार नव्हते त्यांच्या गाडीवर अकरा हजाराचा दंड होता. तो त्यांनी जागेवरच वसूल सुद्ध केला आहे. आमदाराची गाडी आहे, असे सांगूनदेखील ते निघून गेले असते. पण पोलीसांप्रती असलेली आत्मियता दाखवत जागेवरच हा दंड भरला आणि पोलीसांना सहकार्य केले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये बहुतेक मोठ्या रस्त्यावर सध्या पोलीस गस्त घालत आहेत. विशेषतः लसीकरणाची माहिती घेण्यासाठी अनेक शहरांमध्ये पोलिसांनी चेक पोस्ट सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्ती सोबतच गाड्यांचीदेखील चौकशी केली जात आहे. माजलगाव तालुक्यातील परभणी फाटा येथे विशेष मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्यानुसार माजलगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग झोनवाल, उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोह.प्रधान चालक इचके हे कारवाई करत होते.

यावेळी एक फोर्च्युनर गाडी (एमएच-44 एस-0009) तिथून जाताना आडवली. यावेळी ती फोच्यूनर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्या नावावर असल्याचे समजले. व त्या गाडीवर ११ हजार रुपयांचा पेंडिंग दंड असल्याचे दिसले. यावेळी चालकाने अक्षय मुंदडा यांना संपर्क केला. यावर त्यांनी दंड भरा व पोलीसांना सहकार्य करा, असे सांगितले. दरम्यान चालकाने ११ हजार रुपये दंडदेखील भरला.

Team Global News Marathi: