उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवून पंढरपूरला गेल्याचे काय कौतुक? निलेश राणेंचा टोला

 

मुंबई | आषाढी एकादशीच्या महापुजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत पंढरपूरला सहपत्नी पोहचले होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता त्या पाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्याच्या स्वत: गाडी चालविण्याचे काय कौतुक? असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवून पंढरपूरला जाणे यात कौतुक काय?, स्वत: गाडी चालवल्यामुळे महाराष्ट्राला पैसे मिळाले, की महाराष्ट्रातून कोरोना गेला?, असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला आहे.

तसेच, राज्यातील पूरपरिस्थिती, मुंबई तुंबली, दुर्घटना याचं डॅमेज कंट्रोल कसे होते , याची माहिती काढण्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी मागच्या सीटवर बसायला हवं होतं. तुम्हाला रिझल्ट देण्यासाठी खुर्चीवर बसवले , गाडी चालविण्यासाठी नाही, अशी टीका राणेंनी केली. विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही, असेही राणेंनी म्हटले.

Team Global News Marathi: