ठाकरे सरकारचे वैशिष्ठ काय ? तर… केशव उपाध्ये यांचा टोला

ठाकरे सरकारचे वैशिष्ठ काय ? तर केशव उपाध्ये यांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी आरे येथील कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग (पूर्व) येथील जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय दिला होता. मात्र उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला सदर जागेवर काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड आहे त्या स्थितीतच ठेवण्यास सांगितले आहे. या निर्णयानंतर आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झालेली आहे. यावर आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

‘उद्धव ठाकरे सरकारचं वैशिट्य काय? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे’, असे ट्विट भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं. तसेच, ‘सरकारने घेतलेल्या मनमानी निर्णयांची कोर्टाकडून फजिती होते’, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

तर विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? या कामात जेवढा उशीर होईल तितकं नुकसान होईल. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आता आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: