नदी, विहिरी, तलावाच्या काठी ठाण असलेल्या साती आसरा म्हणजे काय ; वाचा महत्त्व आणि इतिहास

नदी, विहिरी, तलावाच्या काठी ठाण असलेल्या साती आसरा म्हणजे काय ; वाचा महत्त्व आणि इतिहास

सातीआसरा ह्या सात देवी सदा एकत्र पूजल्या जातात. सात जणी बहिणी, मोठ्या बाया इ. नावांनी या देवी ओळखल्या जातात.

प्राचिन काळापासून उपास्य असलेल्या “सप्तमातृका” यांचे हे ग्राम्य रुप आहे. ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. तसेच अनेकवेळा गणेशी, नरसिंही ह्या देवता देखील यात समाविष्ट केल्या जातात. यांच्यासोबत गणपती किंवा कार्तिकेय किंवा म्हसोबा पुजला जातो, ज्याला ग्रामिण भागात गवळी / कृष्ण समजले जाते नदी, विहिरी, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे ठाण असते. या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात. साती आसरांचे गोड्या व खाऱ्या असे प्रकार असतात त्या अनुक्रमे शांत व उग्र समजल्या जातात.

आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रवाह फार प्रचलित आहे. पाण्यात राहणाऱ्या या अती सुंदर स्त्रिया व्यक्तीस भुरळ पाडून पाण्यात खेचून नेतात अशी दोन्ही || संस्कृतींमध्ये समान धारणा आहे. पण प्रामुख्याने पंच तत्वापैकी जल तत्वाच्या पुजेचे त्या प्रतिक असाव्यात. आषाढात उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी साती आसरांचे पुजन केले जाते. पाणवठ्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार केला जातो. “सात जणी बहिणी, आठवा कान्हा, कान्हा खेळतो, या गोकुळामंदी गं कृष्ण नांदतो”.

कुलदेवतेचा सोबत प्रत्येक कुळात अन्य उपासना असतात. त्या शोधून संपूर्ण वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते. कुळाची समृद्धी, भरभराट, वंश वृद्धी इत्यादी कार्ये करणारी अत्यंत सोवळी उपासना-साप्ताधृतमर्तुक-साती आसरा-जलदेवता-सात महालक्ष्मी-माउली-गौरी अशी स्वतंत्र उपासना कुळात राहते. यांचा निवास समुद्र, नदी, तलाव, विगीर, पाणवठा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी राहतो कुळाचा वंश परंपरेने तिथे संबंध असतो.

गणपती, देवी, शिव, विष्णू, दत्तात्रय अशा देवता त्या ठिकाणी नांदत असतात. त्यांचे पूजन-भोजन हे सुव्यवस्थितपणे व्हावे लागते.

एकवीस पिढ्या काहीही न करता या जलदेवता कुळामध्ये नांदतात त्यांचा स्वतंत्र विधी असतो. स्वतःचे मूळगाव तेथूल ग्राम देवता आणि चालू गाव तेथील ग्राम देवता, स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि चालू घर { शहर } तेथील वस्तू पुरुष, क्षेत्र पाल या उपासना देखील कुलदेवतेच्या सोबत करायच्या असतात.

आसरा म्हणजे जलअप्सरा. ह्या नेहमी पाण्याच्या आसपास, पाण्याच्या आतमध्ये राहतात. या एक प्रकारच्या गौण देवता असून कोणाला त्रास देत नाहीत. पण कोणी अभक्ष्य भक्षण किंवा अपेय पान करत असेल तर त्याला धडा शिकवतात. पाणवठ्याकाठी बसून दारू वगैरे पिणाऱ्यांना किंवा काही वाईट उद्देशाने फिरणाऱ्यांना त्या त्रास देऊ शकतात.

कधी कधी कोणा कोणाला अचानक दिसू शकतात. पण लगेच अदृश्य होतात. आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे. यांना माउल्या देखील म्हटलं जातं. या पाणवठ्याजवळच राहतात. त्या पाणवठ्याजवळ म्हसोबाचे ठाणे असते. काहीजण त्याला गवळीबाबा असेही म्हणतात. हे खरंतर कृष्णाला संबोधून असावं अस मला वाटतं. कृष्णजन्माआधी कंसाने सात अपत्ये मारली. त्या मुलीच असाव्यात आणि त्यांनाच साती आसरा म्हणतात अशी मान्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: