पश्चिम बंगालच्या भाजप खासदाराची पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये खासदाराने दिली घटस्फोटाची धमकी
भाजप नेते आणि खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल खान यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वैतागलेल्या खासदार सौमित्र खान यांनी त्यांना तलाकची नोटीस देण्याची धमकी दिली आहे. राजकारणामुळे आपले वैवाहिक जीवन संपुष्टात आले, असे सौमित्र यांनी म्हटले आहे.
सुजाता मंडल खान या स्वतःही राजकारणात सक्रीय आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनीच पती सौमित्र यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच न्यायालयाने सौमित्र खान यांना विष्णुपूर या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. त्यावेळी प्रचाराची सर्व धुरा सुजाता मंडल यांनीच खांद्यावर घेतली होती. त्यामुळेच त्यांच्या भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याला महत्व प्राप्त झाले आहे.
I would request her to stop using the surname 'Khan'. I am severing all relations with Sujata today. I am sending her a divorce notice. I also request the media to not label her as a 'Khan': BJP leader Saumitra Khan, on his wife Sujata Mondal Khan joining the Trinamool Congress https://t.co/wNSniXqa8t pic.twitter.com/9278HFOdgW
— ANI (@ANI) December 21, 2020
सुजाता मंडल या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत मंचावरही असत. पश्चिम बंगाल भाजपच्या एक महत्वाच्या नेत्या म्हणून त्यांचा उदय झाला होता. मात्र भाजपमध्ये आपली उपेक्षा होत आहे. भाजपने आपणाला स्वीकारले नव्हते आणि आपल्या कामाचे कौतुकही केले नाही, असे सुजाता यांचे म्हणणे आहे.