वीकेंड लॉकडाऊन : काय आहे नियमावली जाणून घेऊया !

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढल आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. त्याचमुळे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकरकडून शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा विकेंडलॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे नियमावली चला जाणून घेऊया

१ ) शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन असला तरी लसीकरण सुरू राहणार आहे. नागरिकांना नोंदणीचा मेसेज दाखवून प्रवास करता येणार आहे.

२) या दोन दिवसीय लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

३) वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

४) वाहतुकीची साधने जसे की, रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर हॉटेलमधून होम डिलिवरी सुरू राहील.

५) विकेंडला सुरु असलेल्या लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अनावश्यक रस्त्यावर फिरू नका असे आव्हान करण्यात आले आहे.

६) शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

राज्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आला आहे. म्हणून सर्व नागरिकांनी या विकेंड लॉकडाऊनचे नियम पाळून राज्य सरकारला सहकार्य करून कोरोनाला रोखण्यात मोलाचे सहकार्य करावे जेणेकरून या संसर्गाच्या धोक्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील.

Team Global News Marathi: