आम्ही हफ्ते देतो मग बंद का पाळायचा? दादरमध्ये भाजीवाल्यांचं शिवसेनेला प्रतिउत्तर

 

मुंबई | राज्यातील विविध जिल्यांमध्ये महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व मुख्य बाजारपेठ बंद आहेत. ग्रामीण भागातही व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा दिला आहे. त्यात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सकाळी ९ वाजता रस्त्यावर उतरणार आहेत. व्यापारी आणि नागरिकांना बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे फुलमार्केटमधील वयापारी वर्गाने या बंदला विरोध दर्शवला आहे.

दादरमध्ये भाजी मार्केट सुरूच असल्याचं माध्यमांमध्ये दाखवण्यात आलं होतं. आता हाच धागा पकडत भाजपाने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते डॉ. संजय कुंटे म्हणाले की, “महावसुली” आघाडीने पुकारलेल्या बंदला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या “दादर” मध्येच प्रतिसाद नाही, आम्ही हप्ते देतो तर बंद का पाळायचा भाजी वाल्यांचे चोख प्रत्युत्तर आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. १०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे. लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारला विचारला आहे.

Team Global News Marathi: