महाविकास आघाडीमध्ये आमचं नुकसान होतेय, सेना खासदाराने व्यक्त केली नाराजी

 

हिंगोली | राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापण झालेले असताना दुसरीकडे मात्र या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आता आघाडीत असल्यामुळे शिवसैनिकांचे १०० टक्के नुकसान होत आहे, अशी खंत शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्ती केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील आपली होत असलेली घुसमट व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणाले की, ‘राज्यातील या आघाडीमध्ये आमचा वापर करून घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.’ यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. हेमंत पाटील आज नांदेड मध्ये बोलत होते

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नसले असले तर तुम्ही कुठे असता? असा सवाल करत खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये. अशी टीका शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली. चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं म्हटलं होतं, त्याला पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

Team Global News Marathi: