सचिन वाझेच्या समोरच झाली होती मनसुख हिरेन यांची हत्या

अंबानी यांच्या घराजवळ मिळलेल्या स्फोटके प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात आता रोज नवीन नवीन खुलासे होताना दिसत आहे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली, त्या वेळी वाझेदेखील स्पॉटवर हजर होता, अशी माहिती ATS तपासातून पुढे आली आहे.

सध्या हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा दावा ATS ने केला होता तसेच तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ATS चे चीफ जयजितसिंग यांनी काही दोनच दिवसांपूर्वी सांगितले होते. मनसुख याचा मोबाइल आणि सिमकार्डची सुद्धा वाझे यांनीच विल्हेवाट लावल्याचा संशय ATSच्या अधिकाऱ्यांना आहे.

या प्रकरणी ATS ने जमविलेल्या पुराव्यांवरून मनसुखची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर श्वास रोखून त्यांची हत्या करण्यात आली. जवळच एका कारमध्ये बसून वाझे हे सर्व पाहत होते. एटीएसने घटना घडली त्यावेळी मोबाइल लोकेशन तपासून यासंदर्भात सबळ पुरावे गोळा केले आहेत.

ATS ने दिलेल्या माहितीनुसार, मनसुखच्या चेहऱ्यावर बांधलेल्या पाच रुमालांमध्ये क्लोरोफॉर्म टाकण्यात आले होते. श्वास रोखून मारल्यानंतरही आरोपींना मनसुखच्या मृत्यूबाबत शंका होती. त्यामुळे त्यांनी त्याला खाडीत फेकून दिले असा घटनाक्रम ATS ने सांगितला आहे.

Team Global News Marathi: