वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा केंद्राने चौकशी केल्यास फटाक्याची माळ लागेल -राज ठाकरे

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सचिन वाझे यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींचे टार्गेट दिले. महाराष्ट्रात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलिस आयुक्त आहेत. त्या सर्व आयुक्तांना कितीचे टार्गेट देण्यात आलं? असा सवाल उपस्थित करत केंद्राने यात हस्तक्षेप करून चौकशी करण्याची मागणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच केंद्राने यात हस्तक्षेप केला तर फटक्यांची माळ लागेल असे सूचक वक्तव्य सुद्धा राज ठाकरे यांनी केले होते.

पुढे सचिन वाझे आणि शिवसेना संबंधांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, वाझे हा मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा होता. वाझेंना शिवसेनेते प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेले होते, हे अजूनही बाहेर आलेलं नाही. विझेल पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. याचा अर्थ वाझे आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे संबंध होते असा खुलासा सद्ध राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

Team Global News Marathi: