सावधान: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

ग्लोबल न्यूज – राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी राज्यात पंधरा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज दिवसभरात 15 हजार 602 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 88 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 97 हजार 793 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 25 हजार 211 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात 7 हजार 467 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

राज्यात सध्या 1 लाख 18 हजार 525 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. पुण्यात 24 हजार 025 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 16 हजार 014 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज दिवसभरात 88 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 811 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.31 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.49 टक्के झाले आहे.

आजपर्यंत राज्यात 1 कोटी 74 लाख 08 हजार 504 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 22 लाख 82 हजार 191 सकारात्मक आले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 695 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 031 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: