सावधान: देशात पुन्हा कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत 18840 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू

सावधान: देशात पुन्हा कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत 18840 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा (Corona Cases in India) धोका आटोक्यात आला असला, तरी नवीन रुग्णांचा आलेख कमी होण्याचं नाव घेत नाहीय. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 18840 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. 16,104 लोक बरे झाले आहेत. तर, या संसर्गामुळं 43 लोकांचा मृत्यू झालाय.

 


सध्या देशात सक्रिय प्रकरणं 1,25,028 आहेत. अहवालानुसार (Health Ministry), देशातील दैनंदिन सकारात्मकता दर 4.14 टक्के आहे, तर पुनर्प्राप्तीचा दर 98.51 आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 198.65 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

शनिवारी आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशात 18840 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 28 वर पोहोचलीय. यासोबतच 43 रुग्णांचाही कोरोनामुळं मृत्यू झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे 18 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

 

काल म्हणजेच 8 जुलै रोजी 18815 प्रकरणे प्राप्त झाली असून 38 मृत्यूची नोंद झालीय. याआधी म्हणजेच, 7 जुलै रोजी 18930 प्रकरणे नोंदवली गेली होती, तसेच 35 लोकांचा मृत्यू झाला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: