वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, नवाब मलिकांची पुन्हा टीका

 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत एकाच खळबळ उडवून देत आहे. तसेच आज तागायत मलिक यांनी वांकडें यांच्यावर अनेक गंभर आरोप केले आहे. आज पुन्हा एकदा ट्विट करत वानखेडे यांच्या मेहुणीवर घणाघाती टीका करत ड्रग्स व्यवसाय करत असल्याची विचारणा केली आहे.

नवाब मलिकांनी थेट क्रांती रेडकरच्या बहिणीचे जुने प्रकरण समोर आणलं असून वानखेडेंना सवाल केला आहे. वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर ही ड्रग्ज व्यवसायात आहे का? असा सवाल नवाब मलिकांनी केला असून याचे उत्तर वानखेडेंनी द्यावे अशी मागणी केली आहे. समीर वानखेडे आणि मोहित भारतीय हे पार्टनर असून त्यांनीच हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यानंतर आता वानखेडेंच्या मेव्हणीवरही नवाब मलिकांनी निशाणा साधला आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे दहशत निर्माण करुन कलाकरांकडून वसुली करत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची कारवाई ही बनावट होती यामध्ये मोहित भारतीय यांचाही समावेश असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तर आता ड्रग्ज प्रकरणावरुन मलिकांनी थेट वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्यावरुनही सवाल उपस्थित केला आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना सवाल केला आहे. मलिक म्हणाले की, एक केस पुण्यातील कोर्टात पेंडींग आहे. ही ड्रग्ज प्रकरणातील केस असून याची पुढील सुनावणी मार्च २०२२ आहे का? हे प्रकरण खरं आहे का? आणि याच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित आहे का? असा सवाल मलिकांनी केला आहे. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी यावर उत्तर द्यावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Team Global News Marathi: