विनायक मेटेंचा अपघात की घातपात? सत्य समोर यावं- आबासाहेब पाटील

 

मुंबई |  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मेटेंच्या मृत्यूबाबत हा अपघात की घातपात? अशी शंका व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार? आज मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली होती, त्यासाठी विनायक मेटे हे मुंबईला येत होते. मुंबई द्रुतगती मार्गावरून येत असताना ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर जवळपास दोन तास रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? घटनेमागचं सत्य समोर यावं. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. अशा मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आबासाहेब पाटील पुढे म्हणाले. हा एक लढवय्या नेता होता, ज्यानी मराठा समाजासाठी सभागृहात आवाज उठवला. समाजाच्या आरक्षणाबाबत प्रचंड अभ्यास केला. समाजाचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले. मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालंय. आमची विनंती आहे. की मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि याचा लवकरात लवकर निकाल लावावा. आणि मराठा आरक्षण देऊन मेटे यांचं स्वप्न पूर्ण करावं. हीच खऱ्या अर्थाने मेटेंना भावपूर्ण श्रद्धांजली असेल.

Team Global News Marathi: