मागास अयोग्य रद्द करण्याच्या मुद्द्यावर विनायक मेटे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटणार !

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत आतां आता याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यात बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीआधीच मेटे यांनी मोठी मागणी केली आहे. ओबीसींच्या सोयी सवलतीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसींसाठी नेमलेला मागास आयोग रद्द करण्यात व अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

विनायक मेटे यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला. केद्राने राज्याला अधिकार दिल्यानंतरही राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही हे आज मी सिद्ध करेन. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचा जो मागास आयोग नेमलाय, तो रद्द व्हायला पाहीजे, ओबीसींच्या सोयी सवलतींमुळे अडचण निर्माण झाली आहे, असा दावा मेटेंनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडे मागणी सुद्धा ते करणार आहेत.

छत्रपती स्मारक, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, असे अनेक महत्वाचे विषय आहेत. त्याबाबत आजच्या बैठकीत मुंख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. वडेट्टीवार यांना कुणी तरी सुपारी दिली आहे. त्यामुळे ते वातावरण भंग करत आहेत. समाजात भांडण लावत आहेत. तंटे लावत आहेत. त्यांचे प्रदेशाध्यक्ष अवाक्षर काढत नाहीत, ओबीसी- मराठ्यांत भांडण लावण्याचा कांग्रेसचा अजेंडा आहे का?, असा सवाल त्यांनी केला. त्यासाठीच मंत्र्यांना मोकळं सोडलं का?, कालच बैल पोळा झाला त्यानुळे या बैलांना मोकाट सोडलंय का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: