भोकर चे नवे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून विजय कबाडे रुजू तर विजय पवार यांना निरोप

भोकर चे नवे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून विजय कबाडे रुजू तर विजय पवार यांना निरोप

भोकर( प्रतिनिधी) येथील विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हनुन विजय कबाडे यांनी दिनांक ८आक्टोबर रोजी सुत्रे हाती घेतली असून, येथून बदलीवर गेलेले विजय पवार यांना निरोप देण्यात आला आहे.

भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांची बदली झाल्याने त्यांचा दि.८आक्टोंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात निरोप देण्यात आला,तर नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले,यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने दोघांचेही जंगी सत्कार करण्यात आले.

यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार अहमद भाई करखेलीकर.ज्येष्ट पत्रकार एल.ए.हिरे. पत्रकार अनिल डोईफोडे, पत्रकार श्याम वाघमारे, आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी धर्माबाद नायगाव उमरी किनवट माहूर हिमायतनगर हदगाव मुदखेड बारड. अर्धापूर.धर्माबाद. भोकर येथील पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: