राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण ;विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी यांच्या खांद्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष पद विद्या चव्हाण यांच्याकडे ; पश्चिम महराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी यांची वर्णी
रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद खाली होतं. आज राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत संबंधित घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे.
चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचा कार्यभार देण्यात आला होता. हे पद दोन वर्षांपासून रिक्त होते. प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर विद्या चव्हाण यांनी देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं. महागाई प्रचंड वाढत आहे, आम्ही यावर सतत्याने आवाज उठवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रवादीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या निवडी बरोबरच फौजिया खान यांनी महिला विभागीय अध्यक्षांच्या निवडी केल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे..
फौजिया खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी यांची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.