विधानसभेत गाजणार कन्नड सोयगाव मतदार संघात हर्षवर्धन जाधवांना दानवे यांची लेक देणार टक्कर

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सोयगाव मतदार संघाचा आखाड्याची जास्त चर्चा आहे. मराठवाड्यातले भाजपचे वजनदार नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या यंदा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावत आहेत. त्यांच्या या प्रचारामुळे हर्षवर्धन जाधवांच्या अडचणी अवधनतं दिसून येत आहे.

संजना जाधव यांचं पॉलिटिकल ब्रँडिंग सुरु असल्याचं म्हटलं जातंय.. विशेष म्हणजे संजना जाधव त्यांच्या पतीविरोधात या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. कन्नड सोयगाव मतदार संघावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जाधव यांना शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर आता २०२४ च्या निवडणुकांमध्ये पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहेत. लग्न समारंभ, यात्रा जत्रांमध्ये त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. सोशल मीडियातून त्यांचे कार्यक्रमांचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यामुळे संजना जाधव या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचं स्पष्ट होतंय.

मराठवाड्यात भाजपच्या दोन नेत्यांचा प्रभाव आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. आपापल्या क्षेत्रात दोन्ही नेत्यांची चांगलीच पकड आहे. आता कन्नड सोयगाव मतदार संघातून दानवे यांच्या कन्या राजकीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हा आखाडा निश्चितच आव्हानात्मक ठरू शकतो.

 

Team Global News Marathi: