विदर्भात नाही तर कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

 

आजवर विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वदलेले दिसून आले आहे याला तशी करणी सुद्धा अनेक आहे मात्र आता पश्चिम महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने अथमहत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा तसा मुबलक पाणी आणि येथील जमीन कसदार असल्याने या भागातील शेतकरी शेतीतून भरघोस पिकांचे उत्पादन घेतो.

तसेच शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक राहतात परंतु मागच्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात मानवी आणि अस्मानी संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थीक संकट ओढावले आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांंच्या घटना ऐकून सुन्न व्हायचो पण आता कोल्हापूरसारख्या सदन जिल्ह्यातही शेती परवडत नसल्याने आत्महत्या होत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील वेंगरुळ येथील ओंकार मेघन पंडित (वय 26) या शेतकरी युवकाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. मागच्या कित्येक वर्षांपासून शेतीच्या उत्पादनातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत होता परंतु या भागातीलही शेतकऱ्याची शेती नुकसानीत जात असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या 26 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Global News Marathi: