वरून धवन, पाठोपाठ नितु कपूर कोरोना पॉझिटिव्ह
सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना राजकीय आणि सिने कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येत आहे. त्यात वरून धवल, कीर्ती सेनॉन या कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती आता त्या पाठोपाठ नितु कपूर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नितु कपूर यांनी इंस्टग्रामवरून पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना संदर्भातील माहिती दिलेली आहे.
नीतू कपूर आगामी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होत्या. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आज त्यांनी स्वत: पोस्ट शेअर करत करोना झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी सेल्फ क्वारंटाइन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत असून स्वत:ची काळजी घेत आहे. माझ्या प्रती काळजी आणि प्रेम व्यक्त केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्क वापरा,सुरक्षित अंतर बाळगा आणि काळजी घ्या अशी पोस्ट त्यांनी इंस्टग्रामवरून केली आहे.