रायगडावर उत्खननात सापडली मौल्यवान बांगडी, छत्रपती संभाजी राजेंनी दिली माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजधानी रायगडावर सध्या सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याच सुशोभीकरणासाठी सुरु असलेल्या उत्खननात एक मौल्यवान बांगडी सापडली आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः छत्रपती संभाजी राजेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

छत्रपती खासदार संभाजी राजे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की ,प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत.

मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातू पासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे.

सध्या गडावर सुरु असलेल उत्खनन भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने चालू आहे, आणी या उत्खननातच या वस्तू मिळत आहेत. या प्रसंगी पुरातत्व खात्याचे विशेष कौतुक करावे असे आहे.असे आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: