उत्सवात निर्बंध मोदी सरकारने लादले, भाजपा त्यांच्या विरोधात आंदोलन करणार का?

 

मुंबई | कोरोनाच्या अप्र्श्वभूमीवर अद्याप मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकारने परवानगी दिलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप राज्यभरात शंखानाद आंदोलन करत आहे. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने उत्सवांवर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजप नेते आंदोलन करणार का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

सचिन सावंत यांनी भाजपच्या शंखानाद आंदोलनावर घणाघआती टीका केली आहे. शंखानाद आंदोलन करणाऱअया भाजपला शंखासुराची उपमा देत आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याची टीका सावंत यांनी केली. भाजप शासित राज्यातील सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? असा सवाल देखील सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही

पुढे आणखी एक ट्विटकरून सावंत म्हणतात की, भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे,

Team Global News Marathi: