“उठाव करायला धैर्य लागतं नाहीतर शिवसेनेचे सगळे आमदार आले असते”

 

पुणे | भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयन राजे भोसले यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यांची भेट घेतली आहे. पुण्यातील विश्रामगृहात या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शिंदे गटाने जो उठाव केला तो उठाव करायला धैर्य लागतं नाहीतर शिवसेनेचे सगळे आमदार आले असते, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जबरदस्त स्वागत झालं. कॅबिनेट सामूहिक जबाबदारी असते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना अनेक शहरामध्ये जाणार आहे. त्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. सातारा, कोल्हापूर आणि त्यानंतर सिंधुदुर्ग या शहरात देखील भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्तार झाला. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सगळेच मंत्री कामाला लागले आहे आता लवकरच खाते वाटप होणार असल्याचं ते म्हणाले. आमच्यातले काही आमदार नाराज नाही.पहिल्या टप्प्यात अनेकजण मंत्रीपद सोडून आले होते. आम्ही सगळे गेलो तेव्हा 7 मंत्री होते. मनाचा मोठेपणा थोडा पहिल्या टप्प्यात दाखवावा लागतो. मंत्रिपदाचा दुसरा टप्पा येईल त्यावेळी सगळ्यांना संधी मिळेल. बच्चू कडू यांचा देखील योग्य मान राखला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: