उर्फी जावेद मुस्लिम असल्यानेच तिला भाजपकडून टार्गेट केलं जातंय का?

 

मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेद हीच्या कपड्यांवरून राजकीय राजकारणात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष अधिक वाढताना दिसत आहे. उर्फी जावेद हीच्या कपड्यांवरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस हे प्रकरण वेगळेच वळण घेऊ लागले. चित्रा वाघ यांच्या मागणीला भीक न घालता उलट उर्फीनेच त्यांच्यावर ट्विट हल्ला चढवला.

यातच आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आपला देश संविधानावर चालतो. उर्फी जावेदने काय कपडे घालावेत किंवा घालू नयेत. हा तिचा निर्णय आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड किंवा अश्लील कपडे घातलेले आहेत. मात्र त्यावर कधीही कुणी आवाज उचलला नाही. त्यांच्या बाबतीत आताही बोलले जात नाही. उर्फी जावेदलाच भाजपा का टार्गेट करत आहे. उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का? अशी विचारणा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

मविआच्या काळात केतकी चितळलेा त्रास दिला. तसेच उर्फी जावेदला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फिरवले जाईल. सत्तेचा हाच दुरुपयोग केला जात आहे. चित्राताईंना माझे एकच सांगणे आहे की, उर्फी जावेदच का? वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला केतकी चितळेला फिरवले गेले. तसेच आता उर्फी जावेदला देखील वेगवेगळे पोलीस स्थानकात फिरवले जाईल. सत्तेचा दुरुपयोग असाच केला जातो, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. यावरती आता भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: