युपीत सर्व महिलांना भाजपला मतदान केलं असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला

 

मुंबई | पाच राज्याचा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव केला. तर, उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपच पुढे चालत आहे. त्यामुळे, पाच राज्यांच्या निकालात पंजाब वगळता इतर ठिकाणी कमळाने बाजी मारल्याचं चित्र आहे. या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलं जात असलेल्या ५ राज्यांच्या निकालात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसचा दारुण पराभव केला. या निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. या ५ राज्यांच्या निकालासंदर्भात चंद्रकात पाटील यांनी आपल मतं मांडलं आहे.

एक परिपक्व राजकीय नेता म्हणून मी निकालावर लगेच मत मांडणं योग्य नाही. पण, सध्या जे चित्र दिसत आहे, त्यावरुन ५ पैकी ४ राज्यांत भाजपच विजयी होईल. युपीत सर्व महिलांना भाजपला मतदान केलं असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला, असेही पाटील यांनी म्हटले. तसेच, भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: