नोकरी गेलेल्या बेरोजगारांना मिळणार तीन महिन्याचा पगार, मोदी सरकारचा निर्णय

नोकरी गेलेल्या बेरोजगारांना मिळणार तीन महिन्याचा पगार, मोदी सरकारचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवपासून मोठ्याप्रमाणात उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली होती. त्यातच अर्थव्यवस्थेला मोठा फटका सुद्धा बसला होता. त्यामुळे अनेकांना रोजगार बुडाला होता याच पाश्वभूमीवर आता मोदी सरकारने महत्वपुर्णी निर्णय घेतला आहे.

नोकरी गेलेल्या हजारो कामगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कामगारांना मिळणाऱ्या बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून नियम शिथील करण्यात आले आहेत. करोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा ५० टक्के पगार दिला जाणार आहे. पण ही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांनाच मिळणार आहे.

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच २४ मार्च ते ३१ डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या ५० टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असणार आहेत. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणं अनिवार्य आहे. याशिवाय १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत किमान ७८ दिवसांसाठी त्यांनी योगदान दिलेलं असंल पाहिजे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: