उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करतात, विनायक राऊतांचा टोला

 

शिंदे गट आणि शिवसेनेत चांगलेच शाब्दिक बाचाबाची रंगली आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे.दरम्यान कोकणतही शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा वाद जोरदार पहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर टीका करण्याच्या सपाटाच लावला आहे. दरम्यान खासदार राऊत यांनी मालवण येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले कि, शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत अमिषे दाखवून फोडाफोडी करण्यापेक्षा अन्य पक्षांत असलेल्या आपल्या हितचिंतक व विरोधी पक्षात असताना मदत केलेल्या नातेवाईकांना पहिले शिंदे गटात घ्यावे. मालवण-तळगाव येथील निवासस्थानी खा. राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे.

ते पुढे म्हणाले कि, शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत येणार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक आमदार घडले आहेत. त्यातील आज शिंदे गटात गेले आहेत. परंतु सर्वांच्या पाठीमागून जाऊन उदय सामंत हे शिवसेनेत फोडाफोडीचे काम करत आहेत. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांना वेगवेगळी आमिषे दाखवून तुम्ही शिंदे गटात या, असे सांगत आहेत, हा प्रकार चुकीचा आहे. त्यांना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी हितचिंतक, वेळप्रसंगी कामे केली त्या आपल्या अन्य पक्षात असलेल्या नातेवाईकांना शिंदे गटात घ्यावे, असे खा. राऊत यांनी सांगितले.

Team Global News Marathi: