उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली नसती तर ती दुर्घटना घडली नसती

 

आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज भागात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली नसती तर ती दुर्घटना घडली नसती. राज्यातील आताच्या वातावरणामुळे शिवसैनिक पेटून उठलाय, मात्र कुणाची गाडी फोडण्याची भूमिका शिवसेनेची नाही, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणायचं काम यांनी केलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठला आहे. परंतु शिवसैनिक पेटून उठला म्हणून कुणाची गाडी फोडण्याची भूमिका कुणाची नसेल. आमचा लोकशाही पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही लोकांसमोर जात आहोत. गाड्या फोडण्याच्या भूमिकेला आदित्य ठाकरे यांचं ते समर्थन करत नाहीत.

तसेच भाजपच्या माध्यमातून बंडखोरी केलेल्या आमदारांनी आता आमचा अंत पाहू नये, असे वैभव नाईक म्हणाले. उदय सामंत यांनी लोकशाहीत अनेकवेळा आपले विचार बदलले आहेत. दुर्दैवाने उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली, म्हणून ती घटना घडली. उदय सामंत त्याठिकाणी आले नसते तर ती दुर्घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली.

Team Global News Marathi: