उद्धवजींना सख्खे भाऊ देखील सोडून गेलेत आता त्यांचे केवळ ‘हम दो, हमारे दो’

 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदे गटावर हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांनी शिवसैनिकांचं रक्ताचं नातं निर्माण केलं. परंतू उद्धव ठाकरे यांची सध्या काय अवस्था झाली आहे. हे पण सगळेच पाहत आहोत. सख्खे भाऊ उद्धवजींना सोडून गेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर? चुलत भाऊ देखील नाही. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो, एवढंच मर्यादित आहे, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मस्के म्हणाले की, यांना नातेसंबंध जोडता येतात का?, जेव्हा उद्धवजी व शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी राजकारण विसरून राजसाहेब त्यांच्यापाशी बसून होते. स्वतः गाडी चालवून त्यांना घरी घेऊन गेले. त्यानंतर राज साहेबांच्या मुलावर मोठी शस्त्रक्रिया झाली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही.

राजकारण बाजूला ठेवून आपला पुतण्या म्हणून त्यांनी कधी आस्थेने चौकशी केली का?. ती सोडा आता राज ठाकरेंवरएवढी मोठी शस्त्रक्रिया झाली त्यावेळी देखील उद्धवजी राज साहेबांना पाहिला गेले का? मला नाही वाटत त्यांनी फोन करून राज साहेबांना त्यांच्या तब्येत बाबत विचारलं असेल. यांना कोणाशीच घेणं देणं नाही. शिवसैनिकांशीही यांना घेणं देणं नाही , असे नरेश म्हस्के म्हणाले.

उद्धवजी तुमचे सल्लागार आहेत ते तुम्हाला बुडवायलाच बसलेत त्यामुळे आपले कोण आणि परके कोण हे ओळखायला शिका, असा सल्लाही म्हस्के यांनी ठाकरेंना दिला. तसेच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवावर केलेल्या वक्तव्यावरूनही मस्के यांनी त्यांचा समाचार घेतला.

 

Team Global News Marathi: