उद्धवजींची मुंबईबाहेर मैदान भरायची कुवत नाही, म्हणुनच मुंबईत सभा घ्यावी लागतेय – मनसे

 

हिदुत्वांचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने कार्यकर्त्यांना साद घातली आहे. आज मुंबईतील बीकेसी मैदानात मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेआणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.

गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना सज्ज झाली आहे.

तर दुसरीकडे मनसेकडून या सभेची सातत्याने खिल्ली उडवली जात असून मनसेचे नेते योगेश चिले यांनी देखील याबाबत भाष्य करत सेनेला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, सर्व शिवसैनिकांना माहीत आहे उद्धवजींची मुंबईबाहेर मैदान भरायची कुवत नाही… म्हणुनच मुंबईत सभा घ्यावी लागतेय. आज जर उद्धवजींनी औरंगाबादच नामकरण संभाजीनगर केलं तरच त्यांच हिंदूत्व असली माना. असं त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: