उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ , ‘मशाल’वर समता पक्षाचा दावा

 

शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले आहे, तसेच ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाला मंजुरी मिळाली. मात्र आता उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ या चिन्हावरून अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कारण मशाल या चिन्हावर दिवगंत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केला आहे. त्यांच्या पक्षाकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. समता पार्टीने १९९६ पासून मशाल हे चिन्ह आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीनवरौन पुन्हा एकदा वाद निर्माण होनाची शक्यता वर्तवली जात आहे,

यासाठी त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. समता पार्टीच्या या आक्षेपावर आता येत्या बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीनेही केली आहे.हे पाहता एंन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार आहे.

Team Global News Marathi: