“उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही”

 

सध्या संपूर्ण राज्याचे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावली, तर मैदान पुरणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळत असल्याचा दावा भाजपने केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही. पण राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय, अशी उलट विचारणा रोहित पवार यांनी केली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातील. पण शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून सभा घेतील. माझ्या दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा आहेत. दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र त्यानंतर लोकांच्या हिताची कामे व्हायला हवीत. लोकांचे प्रश्न सुटावीत अशी आशा नागरिक म्हणून मी व्यक्त करतो, असे रोहित पवार म्हणाले.

Team Global News Marathi: