उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर आमदाराला बहिणीचंच आव्हान !

 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली असून आजच्या घडीला संख्याबळाचा विचार केला तर सध्या एकनाथ शिंदे यांचं पारडं अधिक जड आहे. अजूनही शिंदे गटात पक्षप्रवेश सुरुच आहे. तर ठाकरे समर्थकांची संख्या आणखी कमी होताना दिसत आहे. अशात एकदोन घटना अशा घडल्या आहेत, ज्यामुळे भविष्यात ठाकरे गटाला पुन्हा उभारी मिळू शकते.

मंगळवारी कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. तर आज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोर शिवसेना आमदाराला घरातूनच आव्हान मिळालं आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कै. आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात फलक लावून आपण ठाकरेयांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. आर ओ तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार समजले जाणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना हे मोठे आव्हान ठरणारे आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार किशोर पाटील कुटुंबीयांत राजकीय व वैचारिक फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही फुट पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात राजकीय भूकंप ठरू शकतो.

‘राजीनामा द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील’, शिंदे गटातील खासदाराला धमकी

सुषमा अंधारें लवकरच करणार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Team Global News Marathi: