उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर तर भाजपा म्हणते की,

 

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अतीवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ओल्या दुष्काळाची पाहणी करतील. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा सुरु होणार आहे. गंगापूर तालुक्यत दहेगाव आणि पेंढारी या गावात ते पाहणी करणार आहेत.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या आधीच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केलीय , त्यातून उद्धव ठाकरे सत्ता नाट्यांतर नंतर पहिल्यांदा संभाजी नगरात येताय त्यामुळं शेतकाऱ्यांसोबत ते काय राजकीय बोलतात याकडे ही लक्ष लागलंय. दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होणार आहेत.उद्धव ठाकरे संभाजीनगरचा दौरा करण्याआधीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रातोरात संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा कुठे होते, तर 20 मिनिटांत काय पाहणी करणार अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. तसंच आमच्यामुळे का होईना उद्धव ठाकरे अडीच वर्षानंतर का होईना बाहेर पडले असा टोलाही सत्तार यांनी लगावला आहे. आमच्यामुळे शिवसेना रस्त्यावर उतरतेय, आंदोलन करणार म्हणतायत, चांगली गोष्ट आहे, पुतळे जाळा वाईट वाटत नाही, आम्ही लोकप्रिय आहोत, म्हणून त्यांचं पोट दुखतंय अशी टीकाही सत्तार यांनी केलीय.

Team Global News Marathi: