उद्धव ठाकरे तुमच्या मुलाला आणि तुम्हाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल – निलेश राणे

उद्धव ठाकरे तुमच्या मुलाला आणि तुम्हाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल – निलेश राणे

राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षबरोबर युती करून आघाडी सरकार स्थापन केले तेव्हा पासून भाजपा पक्षाने ठाकरे सरकारला घेरण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला आहे. काँग्रेस मधून भाजपात गेलेले राणे पिता-पुत्राने तर ठाकरे सरकारवर सडकावून टीका केली आहे.

त्यातच आता राणे पिता-पुत्रांनी सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. ‘आदित्य ठाकरे यांचे नाव सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डमध्ये आले… त्यांचा सुशांतसिंह प्रकरणात सहभाग जाणवतो. त्यामुळं तुम्हाला व तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल,’ असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप याआधीच भाजपनं अप्रत्यक्षरित्या केला होता. मात्र काळ कोरत सुरु असलेल्या सुनावत अप्रत्यक्षरीत्या आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: