उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी, आमदार अतुल भातखळकर यांची टीका

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु झाले असून या अर्थसंकल्प अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये शाब्दिक युद्ध झालेले पाहावयास मिळत आहे. त्यात आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर केली आहे. आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांना राज्यातील भाजपा नेत्यांसोबतच मोदी सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे” असा टोला लगावला.

यावर प्रतिरूवर देतंय भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, “चीनसमोर पळ काढे” असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी… जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच” असे त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: