उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री;राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा

उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री;राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा

 

ग्लोबल न्यूज | मुंबई- महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत.ते काय काम करतात हे सर्वांना माहीत आहे.त्यामुळे,राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही.देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा,असं विधान भाजपचे बडे नेते विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केले आहे.आज मुंबई येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे.या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी हे विधान केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे.फुलटाईम नाही.राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात,कधी झोपतात,कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे.

या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही.राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे”,अशीही सडकून टीका त्यांनी केली आहे.

तसेच,महाराष्ट्रात विकासाचे काम होत नाही.राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं आणि सत्तेतच यायचं असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा,आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे.2019 मध्ये जनतेने भाजपला मतदान केलं आहे.

 

पण,शिवसेनेने लोकांचा कौल झुगारून त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे.संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे.त्यामुळे,हा मतदारांचा अपमान आहे,असेही ते म्हणाले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: