उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांनी लगावला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी वाढत असलेली रुग्णसंख्या राज्यात पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या उंबरड्यावर आणून ठेवले आहे असे भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले होते. याच मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

‘करोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी पुण्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउन लावला तर आपलं अपयश झाकता येईल, असं या लबाड सरकारला वाटतं. पण या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार? याचा विचार आधी या सरकारने करायला हवा,’ असे पाटील म्हणाले.

पहिल्या लॉकडाउनमधून सावरत सावरत आता कुठे सर्वसामान्य जनतेचं जीवन रुळावर येत होते. परंतु आता या सरकारच्या मूर्खपणामुळे पुन्हा एकदा गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या या लबाड सरकारने पुन्हा लॉकडाउन करताना जनता जुमानत नसल्याचं कारण देऊन यावेळी जनतेवरच आपल्या अपयशाचं खापर फोडलं आहे,’ असा आरोप पाटील यांनी केला.

Team Global News Marathi: