“…त्यापेक्षा शिवसैनिकांच्या हातात जीपीएस ट्रॅकरच बांधूया” मनसेने उडवली खिल्ली

 

शिंदे गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून गेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे सरकार कोसळले तर दुसरीकडे शिंदे गटाने भाजपा बरोबर आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली होती अशातच शिवसेनेच्या बंडखोरीला लगाम लावण्यासाठी प्रतिज्ञापत्राचा नाव खटाटोप शिवसेनेने सुरु केला आहे यावरून आता मनसेने जोरदार टोला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना व्यंगचित्रातून लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एक व्यंगचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये हातात प्रतिज्ञापत्रांची कागदपत्रं घेऊन उद्धव ठाकरे बसले आहेत. टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आम्हीच खरी शिवसेना असे म्हणताना दिसत आहेत. तर आदित्य ठाकरे त्यांच्याकडे येऊन त्यांना एक कल्पना सुचवत आहेत. त्यात ते वडील उद्धव ठाकरेंना सांगतात की, बाबा, एक आयडिया सुचली आहे. आपण शिवसैनिकांच्या शिवबंधन व प्रतिज्ञापत्रांऐवजी त्यांना जीपीएस ट्रॅकरच बांधूया. आदित्य ठाकरे यांच्या या कल्पनेकडे उद्धव ठाकरे अवाक होऊन पाहत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यासाठी भाग पाडल्यानंतर पक्षसंघटना आपल्याकडे टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शिवबंधनानंतर शिवसैनिकांना आपण शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागणार आहे. या अभियानाची सुरुवात राज्यातील अनेक ठिकाणी झाली आहे.

Team Global News Marathi: