दोन महिन्यात OBC आरक्षण मिळून देईन, फडणवीसांच्या गर्जनेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर |

 

 

मुंबई | माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास OBC समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना राज्याचे विरोध पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारी OBC आरक्षण संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्च्यावेळी केली होती. आता त्यांच्या या गर्जनेला शिवसेना नेते आणि कसदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

तसेच कोरोना संसर्गाच्या संकटातही रस्त्यावर उतरून करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. आता राऊत यांच्या या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: