ग्लोबल न्यूज : पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली. कासवा मुळे पैशाचा पाऊस पडतो अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे कासवाचा तस्करीसाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. बारामती पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले.
राजू सजन गायकवाड (वय 22) आणि विजय अरुण गायकवाड (वय 21) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांना आरोपींच्या ताब्यातील रिक्षांमधून एक कासव मिळाले आहे. अधिक चौकशी केली असता त्यांनी हे कासव विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
कासव जवळ बाळगणे अथवा त्याची विक्री करणे हे भारतीय वन्य अधिनियमानुसार गुन्हा आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.