राज्यातील 40 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या तुकाराम मुंडेंची दीड महिन्यात पुन्हा बदली

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तसेच कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता तुकाराम मुंढे यांना थेट मंत्रालयात बसवण्यात आले आहे. तुकाराम मुंढे हे आता कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील. तुकाराम मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत २० वेळा बदली झाली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती

Team Global: