तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत थेट सरकार विरोधात भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा, ता दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

यावेळी केलेल्या भाषणातून महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर केलेल्या भाष्यावर देखील त्यांनी टीका केली. राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री परवा म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं, नाही झालं फरत पडत नाही. मी बोलतोय ना. तू कोण आहेस? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे?

इतकी वर्ष केंद्रात सरकार होतं, आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं, तर प्रश्नच मिटला. मग बोलायचं कशावर? अनेक शहरांमध्ये १०-१० दिवस पाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत अशा शब्दांत राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

Team Global News Marathi: