परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं, वाढणार अडचणी

 

मुंबई | शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं.

नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी ईडी नोटीस मिळाल्यानंतर दिली होती.

परिवहनमंत्री अनिल परब यांना २९ ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं. त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू, असं सांगत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.

Team Global News Marathi: