नगर ः राज्यातील डझनभर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ठाकरे सरकारने केल्या आहेत. यामध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली आहे.तर प्रवीण दराडे यांच्याकडे लघु उद्योग विकास महामंडळाची जबाबदारी सोपवली आहे. अहमदनगर चे जिल्हाधिकारी म्हणून पुण्याहून डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली आहे. या संदर्भातील आदेश मंगळवारी मंत्रालयातून काढण्यात आला.
डॉ. भोसले यांनी या पूर्वी तीन महिने नगरचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची चांगलीच माहिती आहे. डॉ. भोसले यांनी या पूर्वी येथे काम केलेले असल्याने त्यांना सर्व प्रकारची माहिती आहे.
मावळते जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कामाच्या माध्यमातून चांगलाच ठसा उमटवला होता. पदार्पणातच त्यांनी सीना नदीवरील अतिक्रमणे काढून सर्वसामान्य नगरकरांचे कौतुक मिळवले होते. त्याच बरोबर जिल्हा क्रीडा संकुलातील एमआर ट्रेड सेंटरबाबत घेतलेली भूमिका असेल, लॉकडाउनच्या सुरवातीला त्यांनी केलेले काम चर्चेचा विषय ठरला. द्विवेदी यांची बदली होऊ नये यासाठी यापूर्वी “सकाळ’च्या माध्यमातून नागरिकांनी सह्यांची मोहीमही चालविली होती.
डॉ. भोसले हे पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी सोलापूर येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी म्हणून तीन महिने काम केले. या काळात त्यांनी प्रशासकीय कामांचा मापदंड घालून देण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यानंतर त्यांची बदली झाल्याने त्यांचे हे नियोजन मागे राहिले. डॉ. भोसले पुन्हा बदलून आल्याने महसूल प्रशासनात शिस्त येईल. डॉ. भोसले हे सन २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
सी के डांगे, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर काम करतील.
हे आहेत
ए आर काळे यांची नियुक्ती आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन मुंबई या पदावर
डॉक्टर एम एस कळशेट्टी, संचालक जल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर तर
डॉक्टर अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर झाली आहे.
प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर
तर त्यांच्या रेव्हेन्यू सेवेत असलेल्या पत्नी श्रीमती पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई अपील आणि सुरक्षा या रिक्त पदावर झाली आहे.
मुंबई महापालिकेत काही काळ काम केलेल्या श्रीमती जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या पदावर झाली आहे.
महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई या पदावर
एच पी तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त दुग्धविकास मुंबई या रिक्त पदावर
आर बी भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर
डॉ. के एच कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर करण्यात आली
दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याही अद्याप प्रलंबित आहेत.