शुक्रवारपासून मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर दरम्यान धावणार ट्रेन!

सोलापूर,दि.7 : शुक्रवार दिनांक 09.10.2020 पासून गाडी क्र. 02115/02116 मुंबई-सोलापुर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार. गाडी क्रमांक 02115 छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) ते सोलापूर सुपरफास्ट विषेश एक्‍स्प्रेस शुक्रवारपासून (ता. 9) सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरून धावणार आहे. गाडी क्रमांक 02116 सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) सुपरफास्ट विशेष एक्‍स्प्रेस शुक्रवार (ता. 9) पासून सोलापूर स्थानकावरून धावणार आहे.

कोविड-19 (साथीचा रोग) सर्व देशभर कोरोना (साथीचा रोग) साथीच्या आजारामुळे देशाभरात यात्री सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर विशेष यात्री एक्सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत.

महाराष्ट्रात या पाच इंटरसिटी धावणार
– ट्रेन क्र. 02189 मुंबई-नागपूर दुरांतो 10 ऑक्टोबरपासून सीएसएमटीतून दररोज रा.8.15 वा. सुटेल.
– ट्रेन क्र.02123 मुंबई-पुणे सुपरफास्ट स्पेशल डेली 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज सायं.5.10वा. सुटेल.
– ट्रेन क्र.02015 मुंबई-पुणे सुपरफास्ट स्पेशल डेली 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज स.5.40वा. सुटेल.
– ट्रेन क्र. 02105 मुंबई-गोंदिया सुपरफास्ट स्पेशल डेली 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज सायं.7.10वा. सुटून गोंदियाला दुसऱया दिवशी स.11.10 वा. पोहचेल.
– ट्रेन क्र.02115 मुंबई-सोलापूर सुपरफास्ट स्पेशल 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज रा.10.45वा. सुटेल.

रेल्वेची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. सोलापुरच्या नागरिकासाठी दिनांक 09.10.2020 पासून गाडी क्र. 02115/02116सोलापुर-मुंबई-सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार आहे.

सदर गाडी सिध्देश्वर एक्सप्रेसच्या वेळेवर धावेल आणि स्थानकावरील हॉल्ट सुध्दा त्याच प्रमाणे असतील परंतु कर्जत, खंडळा, लोनावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकावरील हॉल्ट दिलेला नाही.

गाडी क्रमांक 02115 छ्त्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई) ते सोलापुर सुपरफास्ट  विषेश एक्सप्रेस दिनांक 09.10.2020 पासून सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरून धावणार आहे.

गाडी क्रमांक 02116 सोलापुर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई ) सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस दिनांक 09.10.2020 पासून सोलापुर स्थानकावरून धावणार आहे.

1.ट्रेनमध्ये कोणताही अनारक्षित कोच राहणार नाही.

2.सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल.  भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस)  डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे  भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: