राज्याच्या ‘या’ भागात येत्या दोन दिवसात मुसळधार; जाणून घ्या कोणकोणत्या भागात ‘अलर्ट’

राज्याच्या ‘या’ भागात येत्या दोन दिवसात मुसळधार; जाणून घ्या कोणकोणत्या भागात ‘अलर्ट’

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन ते चार दिवसानंतर पावसाचा जोर काहिसा कमी होणार आहे. उद्या (शनिवार) आणि परवा (रविवार) कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून रेड, आँरेज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. ही प्रणाली पूर्व आणि मध्य भारतातून मॉन्सूनच्या आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे सरकणार आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग उत्तरेकडे सरकला असून, तो पुन्हा दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत विस्तारला आहे. ही हवामान स्थिती पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. तर मराठवाडा विदर्भातही पाऊस पडत आहे.

राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे. कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे हवेत गारवा तयार झाला आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यत घट झाली आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यत मालेगाव येथे ३२.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.

येथे होणार जोरदार पाऊस :
शनिवार – संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती
रविवार- ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
सोमवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
मंगळवार –रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर,

साभार ऍग्रोवन ई ग्राम

ग्लोबल न्युज नेटवर्क: