आजचे राशिभविष्य :जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 August 2022
वार – मंगळवार
30-08-2022
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस
आज विशेष — हरतालिका, तृतीया
राहू काळ – दुपारी 0.3 ते 4.30
दिशा शूल – उत्तरेस असेल
आजचे नक्षत्र – हस्त 23.49 नंतर चित्रा
चंद्र राशी – कन्या
_________________________
आजचे राशीभविष्य-
मेष – (शुभ रंग – क्रीम)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे.नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न डोकावता कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे.तरुणांनी व्यसने टाळावीत.
वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील.गृहिणी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देतील. नवोदित कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.चैनीसाठी पैसा उपलब्ध होईल.
मिथुन – (शुभ रंग – डाळिंबी)
सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.आवक पुरेशी राहील.जागेचे प्रश्न सुटतील.काही भाग्यवान महिला आज उंची रत्न खरेदी करतील.ब्युटी पार्लर तेजीत चालतील.
कर्क – (शुभ रंग – पिस्ता)
आजचा दिवस धावपळीत जाणार आहे.एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींना तातडीच्या कामासाठी प्रवासाला निघावे लागेल.पालकांना मुलांच्या पुस्तकात डोकवावे लागेल.
सिंह – (शुभ रंग – पांढरा)
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात आज पाहुण्यांची वर्दळ राहील.गृहिणींना उसंत मिळणे कठीण.शेजाऱ्यांशी अबोला असेल तर आज गैरसमज दूर होतील.
कन्या – (शुभ रंग – जांभळा)
नाती सांभाळायची असतील तर डोके थंड आणि वाणीत गोडवा असू द्या.एखाद्याची स्तुती करण्यात कंजूसपणा नको.आज आपली प्रतिष्ठा जपा.
तुळ – (शुभ रंग – मरून)
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल.महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.काही हरवले असल्यास दुपारनंतर गवसेल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.
वृश्चिक – (शुभ रंग – नारिंगी)
सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावाल.जिवलग मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल.सकाळी भरलेले खिसे दुपारनंतर मात्र रिकामे होण्याची शक्यता आहे.
धनु – (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल.काही कर्ज प्रस्ताव केले असतील तर ते मंजूर होऊ शकतील.विरोधक आता दमले आहेत, त्याची काळजी नको.
मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
वडीलधारी मंडळी त्यांचे विचार तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील.वाद न घालता फक्त हो म्हणा आणि सोडून द्या. त्यांच्या वयाचा मान राखणे गरजेचे आहे.
कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)
सम व्यवसायिक स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा.कोणतेही गैरवर्तन नको.आज आपल्या प्रतिष्ठेस जपा.
मीन – (शुभ रंग – निळा)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना समर्थपणे कराल.वादविवादात आपली मते इतरांवर लादू शकता.आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन -९६८९१६५४२४
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)