आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी
शनिवार 29 जानेवारी रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार…
मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. नोकरीत वरीष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. गृहीणी दानधर्म करतील.
वृषभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
नोकरीत आज वरीष्ठांचे समाधान होणे अशक्य. घरात थोर मंडळीही आज आपलेच खरे करतील.
मिथुन : शुभ रंग : केशरी| अंक : ३
आज आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. अटीतटीच्या प्रसंगी पत्नीची भक्कम साथ राहील.
कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ८
तुमचा आत्मविश्वास व मनोबल वाढेल. महत्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर कलेले बरे.
सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : १
घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकाऊ नका.
कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
महत्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.
तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. मुलांना दिलेले शब्द पाळता येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची आवकही पुरेशी राहील.
धनु : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
पारिवारिक समस्या सहज सुटल्याने आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.
मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.
कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील.आज प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.
मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : २
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. मासन्मानात वृध्दी होईल. उत्तम दिवस.